आभाळ फाटलेले, टाका कुठे भरू मी? आता कसे करु मी? स्वप्नी चितारलेल्या झाल्या विराण जागा वाहून पार गेल्या वाळूवरील रेघा पाण्यात त्या मिळाल्या, त्यांना कशी धरू मी? जो मित्र पाठिराखा, तो होय पाठमोरा सार्या मनोरथांचा तो ढासळी मनोरा आयुष्य कोसळे हे, त्या काय सावरू मी? प्रीतीविना जिवाची पंखाविना भरारी आधार ना निवारा आता दिशांत चारी ना अर्थ या जिण्याला, का व्यर्थ वावरू मी?