Back
Fitting…

1 page

आधी गणाला रणी आणला

आधी गणाला रणी आणला
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

धन्य शारदा, ब्रह्म नायका
घेऊन येईल रूद्रविणा
साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा
दाविल यंत्र खुणा खुणा
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

सद्गुरू माझा स्वामी जगद्गुरू
मेरूवरचा धुरू आणा आणा
ब्रह्मांडाभवता । तो एक सवता
दिवाच लाविल । म्हणा म्हणा
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

माझ्या मनाचा । मी-तू पणाचा
जाळुनि केला चुना चुना
पठ्ठे बापूराव कवि कवनाचा
हा एक तुकडा जुना जुना
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

आधी गणाला रणी आणला

आधी गणाला रणी आणला
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

धन्य शारदा, ब्रह्म नायका
घेऊन येईल रूद्रविणा
साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा
दाविल यंत्र खुणा खुणा
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

सद्गुरू माझा स्वामी जगद्गुरू
मेरूवरचा धुरू आणा आणा
ब्रह्मांडाभवता । तो एक सवता
दिवाच लाविल । म्हणा म्हणा
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

माझ्या मनाचा । मी-तू पणाचा
जाळुनि केला चुना चुना
पठ्ठे बापूराव कवि कवनाचा
हा एक तुकडा जुना जुना
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

आधी गणाला रणी आणला

आधी गणाला रणी आणला
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

धन्य शारदा, ब्रह्म नायका
घेऊन येईल रूद्रविणा
साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा
दाविल यंत्र खुणा खुणा
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

सद्गुरू माझा स्वामी जगद्गुरू
मेरूवरचा धुरू आणा आणा
ब्रह्मांडाभवता । तो एक सवता
दिवाच लाविल । म्हणा म्हणा
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

माझ्या मनाचा । मी-तू पणाचा
जाळुनि केला चुना चुना
पठ्ठे बापूराव कवि कवनाचा
हा एक तुकडा जुना जुना
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना