आधीं रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥१॥ जेव्हां नव्हतें चराचर । तेव्हां होतें पंढरपुर ॥२॥ जेव्हां नव्हती गोदा गंगा । तेव्हां होती चंद्रभागा ॥३॥ चंद्रभागेचे तटीं । धन्य पंढरी गोमटी ॥४॥ नासिलीया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥ असे सुदर्शनावरी । ह्मणूनि अविनाश पंढरी ॥६॥ नामा ह्मणे बा श्रीहरी । आह्मी नाचों पंढरपुरी ॥७॥