आई कुणा म्हणू मी
आई कुणा म्हणू मी, तुजवीण सांग आई? इतुकेच सांगण्याला येशील का ग आई? तोडीत ना फुलाला वेली स्वये कधीही सोडून तू मुलाला गेलीस का ग आई? रागावण्या तुलाही मजवीण बाळ नाही बाळाविना तुलाही कोणी म्हणेल आई? चुकतो असेन मी गे, म्हणतो तुला मी आई चुकलीस तू परि का, होऊन माझी आई?