आई म्हणोनी कोणी
आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी ती हाक येइ कानी मज होय शोककारी नोहेच हाक, माते मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई वात्सल्य हे बघुनी व्याकूळ जीव होई येशील तू घराला परतून केधवा गे? रुसणार मी न आता जरी बोलशील रागे आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी