PrintSource

आई तुझं लेकरू

Aai Tujha Lekaru

राम उगांवकर

आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
रानांत फसलंय, रस्ता चुकलंय,
सांग मी काय करू?

या दुनियेची रीतच न्यारी
आजचा मैतर उद्यास वैरी
मतलब सरता लाथा मारी
पाय कुणाचं धरू?

वनवासी मी इथं एकला
आईस मुकलो गाव सोडला
मायेचा ग आधार तुटला
तळमळतंय वासरू?

तुजविण आता कुणी न वाली
तूच बाप अन्‌ मायमाउली
दे पदराची तुझ्या सावली
तडफडतंय पाखरू