आज आपुल्या प्रथम प्रीतिचा
आज आपुल्या प्रथम प्रीतिचा संगम हा झाला ! प्रेमफुलांच्या गळ्यात घालुनि हिंडुया माळा नाचति झाडे, नाचति हो वेली रानपाखरे वेडी झाली ! पृथ्वीवरती स्वर्ग धरेला भेटाया आला ! पहा कोयना इकडून येई, समोरून ही कृष्णामाई ! प्रीतिसंगम सखे असा हा जगामध्ये पहिला !