आज अंतर्यामी भेटे कान्हो
आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी अमृताचा चंद्रमा भाळी उगवला हो फुलांचे केसरा घडे चांदण्याचा संग आज अवघे अंतरंग ओसंडले हो मिटूनही डोळे दिसू लागले आकाश आज सारा अवकाश देऊळ झाला हो काही न बोलता आता सांगता ये सारे आतली प्रकाशाची दारे उघडली हो