आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे स्वप्नाहुन जग सुंदर दिसले तुझ्यामुळे ! भाव अंतरी उमलत होते परि मनोगत मुकेच होते शब्दांतुन साकार जाहले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे ! परोपरीचे रंग जमविले स्तब्धच होते करी कुंचले रंगांतुन त्या चित्र रंगले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे ! करात माझ्या होती वीणा आली नव्हती जाग सुरांना तारांतुन झंकार उमटले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे ! हृदयमंदिरी होती मूर्ती तिमिर परंतु होता भवती आज मंदिरी दीप तेवले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे !