आज गोकुळात रंग खेळतो हरी; राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी ! तो चटोर चित्तचोर वाट रोखतो हात ओढुनी खुशाल रंग टाकतो रंगवून रंगुनी गुलाल फासतो सांगते अजूनही तुला परोपरी ! सांग श्यामसुंदरास काय जाहले? रंग टाकल्याविना कुणा न सोडले ज्यास त्यास रंग रंग रंग लागले ! एकटीच वाचशील काय तू तरी ! त्या तिथे अनंगरंगरास रंगला गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला तो पहा मृदंग मंजिर्यांत वाजला हाय ! वाजली फिरून तीच बासरी !