PrintSource

आज हृदय मम विशाल

Aaj Hriday Mam

शंकर वैद्य

आज हृदय मम विशाल झाले
त्यास पाहुनी गगन लाजले

आज माझिया किरणकरांनी
ओंजळीमधे धरली अवनी
अरुणाचे मी गंध लाविले

या विश्वाच्या कणाकणांतून
भरुन राहिले अवघे 'मी'पण
फुलता फुलता बीज हरपले