आज जिंकिला गौरीशंकर
आज जिंकिला गौरीशंकर जयजय भारत भाग्य शुभंकर सतत झुंजला तुजसी मानव आज तुझा जाहला पराभव तूंच तुझा हा केला गौरव गर्जति जयजय हे गिरिकंदर जलीं जिंकिला, स्थलीं जिंकिला मानवापुढें निसर्ग नमला तिसरें पाऊल ठेवायाला बलिराजा हो उदार भूधर मानबिंदू हा तुंग हिमाचल पंख झडपितां उठवी वादळ तरिही झेप घे हा नरशार्दुल नेपाळाचा वीर धुरंधर तेनसिंह नाचला थयथया विशालदेहीं दुबळी काया तूंच चढविलें माथ्यावरि या जयजय भारत भाग्य शुभंकर