PrintSource

आज कळीला एक फूल भेटले

Aaj Kalila Ek Phool Bhetale

जगदीश खेबूडकर

आज कळीला एक फूल भेटले
हृदय चोरिले, कुणी हृदय चोरिले

असा कसा लपुनछपुन चोर घरी आला
अजाणतेपणी कसे न्याहाळिले त्याला
काही कळेना, मला काय वाटले

बावरली, आतुरली, मोहरली प्रीती
पंख फुटे लहर उठे, गीत जुळे ओठी
प्रणयसुखाचे मनी भाव साठले

घडोघडी मनोमनी भास नवे नवे
जवळ दिसे दूर असे, तेच मला हवे
एक हरवले, आज एक शोधिले