फुले स्वरांची उधळित भवती गीत होय साकार आज मी आळविते केदार ! गोड काहीतरी मना वाटले अबोध सुंदर भाव दाटले मुखी मनोगत सहज उमटले कंपित होता तार ! फिरत अंगुली वीणेवरती मौनातुनी संवाद उमलती स्वरास्वरांवर लहरत जाती भावफुले सुकुमार ! जे शब्दांच्या अतीत उरते स्वरांतुनी या ते पाझरते एक अनामिक अर्थ घेतसे स्वरांतुनी आकार !