Back
Fitting…

1 page

आकाश पांघरूनी जग शांत

आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे

गगनांत हासती त्या स्वप्‍नील मंद तारा
वेलीवरी सुखाने निजला दमून वारा
कालिंदीच्या तीरी या जळ संथ संथ वाहे

भरला स्वरांत त्याच्या भक्तीतला सुगंध
ओठांत आगळाच आनंद काही धुंद
त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे

काहूर अंतरीचे भजनात लोप होई
भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई
उघडून लोचनांना तो दिव्य रूप पाहे

आकाश पांघरूनी जग शांत

आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे

गगनांत हासती त्या स्वप्‍नील मंद तारा
वेलीवरी सुखाने निजला दमून वारा
कालिंदीच्या तीरी या जळ संथ संथ वाहे

भरला स्वरांत त्याच्या भक्तीतला सुगंध
ओठांत आगळाच आनंद काही धुंद
त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे

काहूर अंतरीचे भजनात लोप होई
भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई
उघडून लोचनांना तो दिव्य रूप पाहे

आकाश पांघरूनी जग शांत

आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे

गगनांत हासती त्या स्वप्‍नील मंद तारा
वेलीवरी सुखाने निजला दमून वारा
कालिंदीच्या तीरी या जळ संथ संथ वाहे

भरला स्वरांत त्याच्या भक्तीतला सुगंध
ओठांत आगळाच आनंद काही धुंद
त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे

काहूर अंतरीचे भजनात लोप होई
भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई
उघडून लोचनांना तो दिव्य रूप पाहे