दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो आला ग सुगंध मातीचा बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती आला आला ग सुगंध मातीचा श्रावणात सारे जीव झाले बाई ओले ऊन हळदीचे पानापानांतुन खेळे उभी पिके हिंडोलती, बाळे झाडांची बोलती आला ग सुगंध मातीचा वसुंधरा आज नवरसात बुडाली माळ बगळ्यांची बघ आकाशी उडाली श्रियाळ राजाचा सण चांगुणा मातेचा नागपंचमीचा देव तो ग शोभला कुणी गौरी ग पूजिती, गोफ रेशमी विणती आला ग सुगंध मातीचा