आला किनारा आला किनारा
आला किनारा ! निनादे नभीं नाविकांनो इशारा आला किनारा ! उद्दाम दर्यामधें वादळी जहाजें शिडावून हीं घातलीं जुमानीत ना पामरांचा हकारा आला किनारा ! प्रकाशे दिव्यांची पहा माळ ती शलाका निळ्यालाल हिंदोळती तमाला जणू अग्निचा ये फुलोरा आला किनारा ! जयांनीं दलें येथ हाकारलीं क्षणासाठिं या जीवनें जाळलीं सुखेनैव स्वीकारुनी शूल-कारा- आला किनारा ! तयांच्या स्मृती गौरवें वन्दुनी उभे अंतिंच्या संगरा राहुनी किनार्यास झेंडे जयाचे उभारा आला किनारा !