PrintSource

आला वसंत ऋतु आला

Aala Vasant Rutu Aala

शांताराम आठवले

आला वसंत ऋतु आला
वसुंधरेला हसवायाला, सजवीत नटवित लावण्याला
आला, आला वसंत ऋतु आला

रसरंगांची करीत उधळण
मधुगंधाची करीत शिंपण
चैतन्याच्या गुंफित माला रसिकराज पातला

वृक्षलतांचे देह बहरले
फुलाफुलांतून अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिला

व्याकुळ विरही युवयुवतींना
मधुर काल हा प्रेममीलना
मदनसखा हा शिकवी रसिका शृंगाराची कला