आली बघ गाई गाई
आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणांत फुललासे निशिगंध घोटाळली ताटव्यांत ! आली बघ गाई गाई चांदण्यांचे पायीं चाळ लाविलें कां अवधान ऐकावया त्यांचा ताल ! आली बघ गाई गाई लावी करांगुली गालीं म्हणून कां हसलीस उमटली गोड खळी ! आली बघ गाई गाई लोचनांचे घेई पापे म्हणून कां भारावले डोळे माझ्या लाडकीचे ! आली बघ गाई गाई काढीतसे लांब झोका दमलीस खेळुनिया झाक मोतियांच्या शिंपा !