आली सखी आली, प्रियामीलना ! काय पाहती व्याकुळ लोचन? कानोसा घे मध्येच थबकुन आतुर अंतरी, कंपित अधरी थरथरते कामना आली सखी आली, प्रियामीलना ! काजळकुंकुम रेखुन ल्याली साडी जांभळी, हिरवी चोळी घेई तनुवरी शेला भर्जरी लपवी यौवनखुणा आली सखी आली, प्रियामीलना ! बकुळफुलांनी गुंफिली वेणी कर्णभूषणे झुलती कानी रुणुझुणु गाती कंकण हाती गुपित सांगती जना आली सखी आली, प्रियामीलना !