PrintSource

आली तुझ्या दारी

Aali Tujhya Dari Radha

मो. ग. रांगणेकर

आली तुझ्या दारी राधा
सोडुनी लाज रे सारी, मुरारी

हासती बोलती किती मजलागी
नाही मानिली खंत परि

लावुनी मजला कलंक ऐसा
जाशिल कोठे सांग दुरी

तूचि विसावा मम जिवाला
राहीन एकली कोठवरी?