आह्मां नकळे ज्ञान नकळे पुराण । वेदाचें वचन नकळे आह्मां ॥१॥ आगमाची आढी निगमाचा भेद । शास्त्रांचा संवाद नकळे आह्मां ॥२॥ योग याग तप अष्टांग साधन । नकळेची दान व्रत तप ॥३॥ चोखा ह्मणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम तुझें ॥४॥