गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा पिता-बंधु-स्नेही तुम्ही माउली तुम्ही कल्पवृक्षातळी सावली तुम्ही सूर्य, आम्हा दिला कवडसा ! जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरी ही फुले फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा ! शिकू धीरता, शूरता, वीरता धरू थोर विद्येसवे नम्रता मनी ध्यास हा एक लागो असा ! जरी दुष्ट कोणी करू शासन गुणी सज्जनांचे करू पालन मनी-मानसी हाच आहे ठसा ! तुझी त्याग-सेवा फळा ये अशी तुझी कीर्ती राहील दाही दिशी अगा पुण्यवंता भल्या माणसा !