PrintSource

आम्ही गोकुळच्या नारी

Aamhi Gokulchya Nari

पी. सावळाराम

आम्ही गोकुळच्या नारी
मथुरापुरी, निघालो बाजरी

नयनी या भरोनी अंजन
रुणुझुणू पायी पैंजण
अधरांत या गीतगुंजन
स्मरणात चित्तरंजन, सखा श्रीहरी

भामिनी कुणी कामिनी
मृगनयना कुणी मानिनी
घरोघरीच्या आल्या स्वामिनी
लाखात राधिका गुणी रूपसुंदरी