आमुचे नाव आसू ग
आमुचे नाव आसू ग ! गहिर्या गालांवरल्या गुलाबांच्या कलिकांनो, ऐका ग बाई ऐका ग ! कन्या सासर्याशी जाते ग बाई, मागे परतुनी पहात ही आई पापणीच्या पालखीतुनी मिरवित मिरवित नेते ग नयनांच्या निरांजनी आम्ही जळतो वाती ग आमुचे नाव आसू ग ! बुबुळांच्या बागेमधली ही फुलपांखरे निळी श्रीकृष्णाच्या मुरलीवरली सात टिंबे आम्ही दिली गवळणींच्या गळ्यांतले आम्ही हार झालो ग आमुचे नाव आसू ग ! बिंदुएवढ्या आम्हामध्ये- तरते जगही बुडते ग, बुडते जगही तरते ग आमुचे नाव आसू ग !