PrintSource

आनंदघन क्षणांचा रावा

Aanandghan Kshanancha

अरुण काकतकर

आनंदघन क्षणांचा रावा दुरून यावा
निष्प्राण या जिण्याचा आषाढमेघ व्हावा

मी मागताच दान, उलटे सदैव फासे
माध्यान्ह वेदनेला सुखचंद्र खिन्‍न हासे
निष्पर्ण शुष्क शाख मधुकूजनी भिजावा

स्वप्‍नांस का फुलांच्या नित्‌ जाग बोचणारी
डोळ्यांतली स्मिते अन्‌ अंती आसावणारी
या विद्ध मैफलीचा बेनूर शेवटावा