आणिक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासुनियां ॥१॥ पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनीं । जागृतीं स्वप्नीं पांडुरंग ॥२॥ पडिलें वळण इंद्रियां सकळां । भाव तो निराळा नाहीं दुजा ॥३॥ तुका ह्मणे नेत्रीं केलीं ओळखण । साजिरें तें ध्यान विटेवरी ॥४॥