आरंभी वंदीन अयोध्येचा राजा । भक्तांचीया काजा पावतसे ॥१॥ पावतसे महासंकटीं निर्वाणीं । रामनाम वाणी उच्चारितां ॥२॥ उच्चारितां राम होय पापक्षय । पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥ पुण्यभूमी पुण्यवंतांसीं आठवे । पापीया नाठवे कांहिं केल्यां ॥४॥ कांहिं केल्यां तुझें मन पालटेना । दास ह्मणे जन सावधान ॥५॥