PrintSource

आश्रम की हरीचे हे

Aashram Ki Hariche He

ग. दि. माडगूळकर

आश्रम की हरीचे हे गोकुळ
भासतसे वनवासही मंगल

गोधन देई अमृतधारा
मुरली घुमवितो मंजुळ वारा
दूर सावळी सरिता यमुना
आठवणींची छेडित वीणा
जीवन रम्य निरागस निर्मल

नंदनंदना भाऊराया
तुझिच छाया दिसे वनी या
वार्‍यांनो, जा द्वारावतीला
निरोप सांगा श्रीकृष्णाला
संभ्रमी रे तव भगिनी प्रेमळ