आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥ भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंद ॥२॥ प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखाशी ॥३॥ तुका ह्मणे आह्मां जोगें । विठ्ठला घोगें खरें माप ॥४॥