आताच अमृताची बरसून
आताच अमृताची बरसून रात गेली आताच अंग माझे विझवून रात गेली मजलाच, हाय, माझे जपता न भान आले मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली उरले जराजरासे गगनात मंद तारे हलकेच कूस माझी बदलून रात गेली अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्याचा.. गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली?