PrintSource

आठवणींनो उघडा डोळे

Aathavanino Ughada Dole

पी. सावळाराम

घरास माझ्या परतुनि आले
आठवणींनो, उघडा डोळे

मायपित्याविण पोर पोरकी
तुम्हीच मजला पोटी धरिले
दहीभाताचा घास भरविता
लहानाची मज मोठी केले

गौरीहर तो इथे पूजिला
वाजतगाजत सासरी गेले
मिठी मारता, कर थरथरता
आसवांचे अमृत प्याले

मोठ्याची मी सून होता
नाही बघवले ह्या दैवाला
आठवणींनो, नयनी बघु द्या
कशी वागले, कशी मी चुकले?