आठवतो का बालपणा तुज? बालपणातील सहवासाच्या थोर जाहल्या आज खुणा उद्यानातील ही पुष्करणी हळूच खुडिली कमळे कोणी? कुणी गुंफिला हार मनोहर आणि वाहिला सांग कुणा? इथे रुजविली कुणी मालती? कुणी घातला मांडव भवती? कळ्यांत पण या तुझाच दिसतो अबोल सुंदर गोडपणा झुके डहाळी तरू मोहरला त्यास बांधला कुणी हिंदोला? कुणी चढविला वरती झोला हात लाविण्या रे गगना? आठवतो मज बालपणा