आठवे अजुनी यमुनातीर
आठवे अजुनी यमुनातीर तुझ्या मुरलीचे सूर मनोहर, शीतल सांज समीर कळते मज की मी पर-नारी सुखी असावे मी संसारी पुन्हा न दिसणे सखा श्रीहरी भासामागे तरीही धावे वेडे चित्त अधीर प्रीत पतीची लाभे निर्मळ घरात नांदे भरले गोकुळ तरी न विसावे हे मन चंचल सौख्य छळे मज दु:खासम हे डोळा दाटे नीर हरपुन गेले त्याच्यासाठी खुळा हुंदका येतो ओठी उरी ठरे ना, ठरे न पोटी गूजासह या कैसी गाठू या जन्माचे तीर