आवडला मज मनापासुनी गडी तो घोड्यावरचा कराडचा की कोल्हापूरचा, दिसला मोठ्या घरचा ऐन विसाची असेल उमर, दिसे वाईसा मोठा तंग मलमली कुडता अंगी, डोईस हिरवा फेटा घोड्यावरची मांड पहाता जोर उमगला वरचा मान उचलुनी वर बघवेना नजर कहारी भारी नजरानजरी चुकुन होता, उगीच हसली स्वारी बाजाराला जाता जमला शिनवे त्याचा आमचा नाव न पुशिलं गाव न पुशिलं, झाली न बोलाचाली घडू नये ते घडलं बाई, खूण राहिली गाली दिवसारात्री तसाच दिसतो हले न डोळ्यापुढचा