PrintSource

आभास हा छळतो तुला

Abhas Ha Chhalato Tula

अश्विनी शेंडे

कधी दूरदूर कधी तू समोर मन हरवते आज का
का हे कसे होते असे ही आस लागे जीवा
कसा सावरू मी आवरू ग मी स्वत:
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला !

क्षणात सारे उधाण वारे झुळुक होऊन जाती
कधी दूर तूही कधी जवळ वाटे पण काहीच ना ये हाती

मी अशीच हासते उगीच लाजते पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला बाहते तुझ्याचसाठी सजते

तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला !

मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस खरा कसा रे

तू इथेच बस न, हळूच हस न, अशीच हवी मला तू
पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू

नवे रंग सारे नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला !