अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥ उंबरठ्यासी कैसे शिवू आह्मीं जाति हीन । रूप तुझे कैसे पाहूं त्यात आह्मीं दीन । पायरीशी होऊ दंग गाउनी अभंग ॥२॥ वाळवंटी गाऊ आह्मी वाळवंटी नाचू । चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ । विठ्ठलाचे नाम घेऊ होउनी निःसंग ॥३॥ आषाढी-कार्तिकी भक्तजन येती । पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा ह्मणे नाम घेता भक्त होती दंग ॥४॥