अधीर मन झाले
अधीर मन झाले मधुर घन आले धुक्यातुनी नभातले सख्या, प्रिया सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले ! मी अशा रंगाची मोतिया अंगाची केवड्या गंधाची बहरले ना ! उमगले रानाला देठाला पानाला माझ्या सरदाराला समजले ना ! आला रे काळजा घाला रे झेलला भाला रे गगनभरी झाले रे ! सोसला वारा मी झेलल्या धारा मी प्यायला पारा मी बहकले ना ! गावच्या पोरांनी रानाच्या मोरांनी शिवारी सार्यांनी पाहिले ना ! उठली रे हुल ही उठली रे चालरीत सुटली रे निलाजरी झाले रे !