अहो जाईजुईच्या फुला जरा हसुन माझ्यासंगं बोला जीवघेणा पुरे हा अबोला काय आगळिक सांगा तरी घडली? माझी माया कशी हो तुम्ही तोडली? गोरागोरा हो तुमचा रंग पिकलं लिंबू नितळ तसं अंग चोळी ल्याले गजनाची तंग लाल शालूची आज घडी मोडली माझी माया कशी हो तुम्ही तोडली? चांद पुनवेचा वर सरकला मोगरा शेजेवर सुकला ताटकळून जीव राया थकला घ्या हो मिठीत काया अवघडली ! माझी माया कशी हो तुम्ही तोडली?