ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगूं काई । त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेस म्हणतो आई ॥१॥ देवकीनें वाईला यशोदेनें पाळिला । पांडवांचा बंदीजन होऊनियां राहिला ॥२॥ ब्रह्मांडाची सांठवण योगीयाचें निजधन । चोरी केली म्हणऊन उखळासी बंधन ॥३॥ सकळ तीर्थें जया चरणीं सुलभ हा शूळपाणि । राधिकेसी म्हणे तुझी करीन वेणीफणी ॥४॥ शरण एका जनार्दनीं त्रैलोक्याचा मोक्षदानीं । गाई गोपी गोपबाळां मेळवीले आपुलेपणीं ॥४॥