ऐका ध्रुवबाळाची कथा
मातेसंगे ईर्षा करुनी, पुत्र जातसे अढळपदा ऐका, ध्रुवबाळाची कथा वात्सल्याचा फुटे उमाळा पिता बोलतो, ये ध्रुवबाळा सवती मत्सर होई जागा, आईपोटी जळे व्यथा ऐका, ध्रुवबाळाची कथा दूर लोटुनी काळीज अपुले का मातेने स्वार्था जपले? भगवंताचा ध्यास घेउनी, बाळ चालला विजनपथा ऐका, ध्रुवबाळाची कथा ईर्षा धरुनी अशी मनस्वी विजयी झाला बाल तपस्वी अढळपदाचे दान मिळाले, प्रणाम त्याच्या मनोरथा ऐका, ध्रुवबाळाची कथा