ऐकशील का रे माझे
ऐकशील का रे माझे अर्थहीन गीत? दूर दूर जाते धरुनी उरी तुझी प्रीत ! वाट तुझी बघता दारी पाय थकुन गेले निमंत्रणावाचुनी जवळी मरण मात्र आले फेकलेस चरणावरचे फूल तू धुळीत ! भाग्य हेच अजुनि येतो गंध पाकळीस स्पर्श तुझा झाला होता चुकुन या कळीस उमलताच सुकले तरीही आयु हे पुनीत ! सूर आर्त गीताचा या तुझ्या घरी यावा अश्रुबिंदु एकच नयनी तुझ्या ओघळावा हेतु एक शेवटचा या थरथरे मनात !