PrintSource

ऐसे काही व्हावे

Aise Kahi Vhave

संदीप खरे

ऐसे काही व्हावे
मन शांत निजावे
एकांताच्या वेळी
आकांत निमावे

बघ संध्येच्या वक्षी
कुणी भिरभिरता पक्षी
वाटे त्याचे गाव पुसावे

असल्या वेळी मंद गती
विरून जाती तीन मिती
पाचही प्राणांच्या ज्योती
सौम्यपणाने मिणमिणती
अस्वस्थाचे ओझे क्षणी विसरून जावे

कोण आपुले? परके कोण?
परिचित कोणी? उपरे कोण?
असते कोण? नसते कोण?
असल्यावेळी उरते कोण?
पैलामधले काही मग उजळून जावे