अजून उजाडत नाही ग (२)
अजून उजाडत नाही ग ! शून्य उभे या उगमापाशी, शून्यच केवळ अंती ग अज्ञाताच्या प्रदेशातली संपेना भटकंती ग अज्ञानाच्या सौख्याचाही इथे दिलासा नाही ग अंतरातल्या विश्वासाची आता नुरली ग्वाही ग अजून उजाडत नाही ग ! गूढ सावल्या काही हलती देहाला ओलांडून ग सरकत येते अंधाराची लाट अंगणी दाटून ग जिथवर पणती तिथवर गणती, थांग तमाचा नाही ग आडून आडून साद घालते अदृष्यातील काही ग अजून उजाडत नाही ग !