अमृताचीं फळें अमृताची वेली
अमृताचीं फळें अमृताची वेली । तेचि पुढें चाली बीजाची ही ॥१॥ ऐसियांचा संग देइ नारायणा । बोलावा वचना जयांचिया ॥२॥ उत्तम सेवन सितळ कंठासी । पुष्टी कांती तैसी दिसे वरी ॥३॥ तुका ह्मणे तैसें होइजेत संगें । वास लागे अंगें चंदनाच्या ॥४॥