अमृताहूनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां बा नेघे ॥१॥ सांग पंढरिराया काय करुं यासी । कां रूप ध्यानासि नये तुझें ॥२॥ किर्तनीं बैसतां निद्रे नागविलें । मन माझें गुंतलें विषयसुखा ॥३॥ हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति । नये माझ्या चित्तीं नामा ह्मणे ॥४॥