अमुचा भारत देश महान
Amucha Bharat Desh
जगदीश खेबूडकर
परदास्याची तुटे शृंखला, सरला अंधकार
नभी तिरंगी निशाण चढले, करूया जयजयकार
स्वतंत्र झाली भारतमाता आम्ही तिचे संतान
आमुचा, भारत देश महान !
स्वराज्य येथे सुराज्य व्हावे
रामराज्य या भूवर यावे
त्रिखंडात या अखंड राहो अजिंक्य हिन्दुस्थान
आमुचा, भारत देश महान !
या देशाला शिकवून भक्ती
गांधीजींनी केली मुक्ती
राष्ट्रपित्याने दिले अम्हाला चिरंजीव वरदान
आमुचा, भारत देश महान !
गरीब कोणी, अमीर कोणी
या मातीला समान दोन्ही
माणुसकीचे पाईक आम्ही, नाही थोर लहान
आमुचा, भारत देश महान !