वाचलेली, ऐकलेली, माणसे गेली कुठे? पुस्तकातून पाहिलेली, माणसे गेली कुठे? रोज अत्याचार होतो आरशावरती अता, आरशाला भावलेली, माणसे गेली कुठे? अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा काठावरी उतरली स्वप्नें तहानलेली डोळ्यांत वेदनेचा माझ्या झरा असावा जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा माथ्यावरी नभाचे ओझे सदा 'अिलाही' दाहीदिशा कशाच्या, हा पिंजरा असावा