PrintSource

अंध बिचारी मी जरी बाला

Andha Bichari Mi Jari Bala

गोविंदराव टेंबे

अंध बिचारी मी जरी बाला
पाहिले न कधी शशीसूर्याला
वाण नसे परि आनंदाला
कारण अंध अशी मी बाला ॥

कळ्याफुलांचा रंग तजेला
कसा दिसावा अभागिनीला
परि ते देती सुगंध मजला
कारण अंध अशी मी बाला

पक्षांच्या नभी उडत्या लीला
कुठुन पहाणे या जन्माला
मला ऐकविती परि गानाला
कारण अंध अशी मी बाला