अंगणी माझ्या मनाच्या
अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचु लागले दाटुनी आभाळ आले मेघ बरसु लागले अशा चिंब ओल्या क्षणी पुकारे तुझी साजणी ! चांदीची ही थेंब फुले या माळुनी येती सरी आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी धुंद नाचते उन्मनी पुकारे तुझी साजणी ! गार वारा मन भरारा शिरशिरी देही उठे हा असा पाऊस आणि मी तुला शोधु कुठे खोड ही तुझी रे जुनी पुकारे तुझी साजणी !